तासगाव / प्रतिनिधी
तासगाव शहरासह तालुक्यात सोमवारी दहा गावात 17 रुग्ण सापडले तर तासगाव शहरात दोन रुग्ण सापडले. तालुक्यात 161 दिवसात कोरोना बाधित रूग्णाची संख्या 2808 झाली आहे.
तालुक्यातील सोमवारचे रूग्ण असे…तासगाव-2,कुमठे-5,तुरची-2, वडगाव-2 तसेच शिरगांव कवठे,आळते, चिंचणी, वासुंबे, मणेराजुरी, सावळज, येथे प्रत्येकी एक असे एकूण 17 रूग्ण सापडले आहेत.
तासगाव शहरासह तालुक्यात गेल्या सात दिवसापासून रूग्ण संख्या कमी होऊन दिलासा दायक चित्र पाहवयास मिळत आहे.तासगाव शहरात तर गेल्या सात दिवसात 12 रूग्ण सापडले आहेत.








