आतापर्यंत 900 कोटी खर्च, 250 कोटीची गरज
देवराष्ट्रे वार्ताहर
गेल्या 35 वर्षापासुन रखडलेली ताकारी सिंचन योजना आता पुर्णत्वाच्या मार्गावर आहे. योजनेची बहुतांश कामे मार्गी लागली आहेत. योजनेवर आतापर्यत साधारण 900 कोटी इतका खर्च झाला आहे. तर ऊर्वरीत कामासाठी आणखी 250 कोटीची गरज आहे. हा निधी प्राप्त होताच 27430 हेक्टर लाभक्षेत्रातील शेतकर्याना दिलासा मिळणार आहे. ताकारी योजना 1984 साली आखण्यात आली. योजनेचे भुमीपुजन 20 मे 1984 साली यशवंतराव चव्हाण व तत्कालीन मुख्यमंत्री वसंतरावदादा पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी योजनेवर 83 कोटी 43 लाख खर्च अपेक्षित धरण्यात आला होता.
तद्नंतर योजनेस टप्प्याटप्प्याने निधी मिळत गेला. योजना रखडत गेल्याने योजनेवरील खर्चातही मोठी वाढ झाली. योजनेचे एकुण चार टप्पे असुन साटपेवाडी येथुन कृष्णा नदीचे पाणी ऊचलुन लिफ्ट करुन मुख्य कालव्यात सोडले जाते . यासाठी पहिल्या टप्प्यात दोन हजार अश्वशक्तीचे सोळा पंप्प व दुसर्या टप्प्यातही तेवढेच पंप्प आहेत. आतापर्यत योजनेचे 16 हजारहुन अधिक हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे.योजनेअंर्तगत कडेगाव, पलुस, खानापुर, तासगाव तालुक्यातील गावांचा समावेश आहे.तर वाळवा तालुक्यातीलही काही गावांना योजनेचा लाभ मिळत आहे.
आतापर्यत योजनेचा 144 किमी.चा मुख्य कालवा , 11 किमीचा चिंचणी भरण कालवा , 23 किमीचा सोनसळ डावा कालवा , अस्तरीकरण, चार टप्पे, भुसंपादन, वितरीका दोनचे बंदिस्त पाइपलाईन, भुसंपादन आदी कामांसाठी 900 खर्च आला आहे.