बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (केसीईटी) च्या निकालाची घोषणा शुक्रवारी (21 ऑगस्ट) करण्यात येणार आहे. आज निकाल जाहीर होणे अपेक्षित होते. पण तांत्रिक कारणामुळे निकाल पुढे ढकलल्याचे सांगण्यात आले आहे.
त्यास दुजोरा देत उपमुख्यमंत्री सी. एन. अश्वथनारायण यांनी बुधवारी, 20 ऑगस्टला जाहीर होणाऱ्या सीईटी परीक्षेचे निकाल आता तांत्रिक कारणांमुळे २१ ऑगस्ट (शुक्रवारी) जाहीर केले जातील, असे म्हंटले आहे.
उच्च शिक्षण प्रभारी मंत्री यांनी, निकाल उद्या दुपारी १२. ३० वाजता http://karresults.nic.in वर विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात येईल, असे म्हंटले आहे.









