ऑनलाईन टीम / मुंबई :
मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करणाऱया तरुणींकडून पंचरांकित हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय करुन घेतल्याप्रकरणी बिगबॉसमधील अभिनेत्री अमृता धनोआ आणि मॉडेल रिचा सिंग या दोन अभिनेत्रींना दिंडोशी पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परिमंडळ 12 चे उपायुक्त डी. एस. स्वामी यांना गोरेगावातील पंचतारांकित हॉटेलमध्ये अभिनेत्री अमृता धनोआ आणि मॉडेल रिचा सिंग या तरुणींकडून वेश्याव्यवसाय करुन घेत असल्याची माहिती मिळाली. अमृता धनोआ आणि मॉडेल रिचा सिंग या दोघी मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करणाऱया अभिनेत्रींना जाळय़ात ओढून त्यांच्याकडून वैश्याव्यवसाय करून घेत होत्या.
पोलिसांनी बनावट ग्राहकाद्वारे अमृता धनोआशी संपर्क साधून दोन तरुणींची मागणी केली. त्यानंतर गोरेगाव भागातील ‘वेस्टीन’ या पंचतारांकीत हॉटेलमध्ये सापळा रचून पोलिसांनी दोन तरुणींची ताब्यात घेऊन सुटका केली.









