सातारा / प्रतिनिधी:
दलित वस्तीचा निधी इतरत्र वळवल्याबाबतच्या तक्रार केल्याच्या रागातुन सरपंचांनी दलित कुटूंबाचा पाणी पुरवठा बंद केल्याचे वृत्त तरुण भारतने प्रसिद्ध केले होते. तसेच जिल्हा परिषदेकडे तक्रार केली होती.त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी त्या गावचे सरपंच, ग्रामसेवक यांना सूचना देताच बुधवारी पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला.दरम्यान, त्याबाबत मनोहर सावंत यांनी तरुण भारतचे अभिनंदन केले आहे.
सातारा तालुक्यातील सोनगाव येथील मनोहर सावंत यांनी गावात दलित वस्तीकरता आलेला निधी इतर वळवल्याच्या तक्रारी केल्याच्या रागातून त्यांच्या घराचा पाणी पुरवठा गावचे सरपंच पांडुरंग नावडकर यांनी बंद केल्याची तक्रार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्याकडे केली होती. त्याबाबतचे वृत्त तरुण भारतने प्रसिद्ध करताच तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी त्या तक्रार अर्जाची दखल घेऊन कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्यानुसार जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी लगेच सोनगावचे सरपंच, ग्रामसेवक यांना फोन करून सूचना दिल्या.बुधवारी पाणी पुरवठा सुरळीत झाला.त्याबद्दल मनोहर सावंत यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा आणि तरुण भारतचे आभार मानले.









