वैरागचे पॉझिटिव्ह रुग्ण हलवले बार्शीला, प्रशासन खडबडून जागे, सोयी सुविधा कार्यान्वित
प्रतिनिधी / बार्शी
वैराग येथे इंदिरा पॉलिटेक्निकल कॉलेज मुलांच्या वस्तीग्रह मध्ये असणारे कोरोना केअर सेंटर मध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह रुग्ण एकाच इमारतीत ठेवले होते आणि सदर इमारतीत कोणतीही सोयी – सुविधा नसल्याने तेथील रुग्णांनी गोंधळ घातल्याची बातमी दैनिक तरुण भारत संवादच्या सोलापूर आवृत्ती ने प्रसिद्ध केल्यानंतर सोलापूर जिल्हा प्रशासनासह बार्शी तालुका प्रशासन खडबडून जागे झाले आणि आज अगदी एका तासाच्या आत या केअर सेंटर मधील पॉझिटिव्ह रुग्ण बार्शीला हलवले. आणि सर्व सोयी सुविधा वाढविल्या तसेच वैराग पोलिसांनीही त्याठिकाणी आज सकाळी आपला कर्मचारी वर्ग बंदोबस्तासाठी पाठवून वैराग केअर सेंटर च्या अनेक प्रश्नांना आज प्रशासनाने कामाने उत्तर दिले आहे.
दैनिक तरुण भारत संवाद सोलापूर आवृत्तीने छापलेल्या बातमीनुसार या वैराग केअर सेंटरमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह रुग्ण एकाच इमारतीत ठेवले होते. मात्र या इमारतीमध्ये असणाऱ्या शौचालयात पाण्याची कमतरता होती एव्हाना पाणी येतच नव्हते. त्यामुळे सर्व रुग्ण आणि अलगिकरण कक्षातील नागरिक सुद्धा इमारतीच्या बाहेर असणाऱ्या शेतांमध्ये शौचालयाला जात होते. तसेच पिण्याचे पाणी सुद्धा या ठिकाणी उपलब्ध नव्हते. केअर सेंटरला दिवसातून एक टॅंकर पाण्यासाठी यायचा आणि या एका टँकर वरती कोरोना बाधित, कोरोना संशयित आणि कोरणा निगेटिव आणि अलगीकरण कक्षातले असे सर्वजण पाण्यासाठी तोबा गर्दी करत होते. या सर्व परिस्थितीमुळे या कोविड केअर सेंटर मधील सर्व रुग्ण बंडाच्या पवित्र्यात आले होते आणि सर्वजण या कोविड केअर सेंटरला राहण्यास विरोध करत असताना “आम्हाला घरी जाऊ द्या, बाहेरून कुलूप लावा पण येथे आम्हाला ठेवू नका ” येथे काही सुविधा नाही असे सांगत काल या कोविड केअर सेंटरला एकच गोंधळ घातला होता. आणि जर का काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असती तर या कोविड केअर सेंटरला वैराग पोलीस स्टेशन चाही पुरेसे मनुष्यबळ किंवा संरक्षण यंत्रणा कोणतीही हजर नव्हती. याबाबत सविस्तर वृत्त दैनिक तरुण भारत संवाद च्या सोलापूर आवृत्ती छापून आल्यानंतर आज सकाळी जिल्हा आणि तालुका प्रशासन खडबडून जागे झाले आणि या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची आणि वापरण्याच्या पाण्याची संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित झाली. त्याचबरोबर या ठिकाणी असणारे कोरोना पॉझिटिव रुग्ण बार्शीला तात्काळ हलवले असून आता फक्त कोरोना संशयित आणि अलगीकरण केलेले लोक या ठिकाणी हजर आहेत. आज पासून या कोविड केअर सेंटरला जेवण, पाणी आणि इतर भौतिक सुविधा पुरवल्या गेल्या आहेत तरच वैराग पोलिसांनीही आज सकाळपासून या ठिकाणी आपले कर्मचारी वर्ग वाढवून पुरेशी सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केली आहे.
या ठिकाणी आम्हाला जनावराच्या गोठ्यात डाम्बल्या सारख झालं होतं. पिण्यासाठी पाणी नव्हतं तर शौचालय घाण असून तिथे सुद्धा पाणी नव्हते म्हणून आम्ही इथे राहणार नाही अशी भूमिका घेतली होती मात्र दैनिक तरुण भारत संवाद ने या प्रकरणात लक्ष घालून इथले पॉझिटिव्ह रुग्ण हलवले आहेत. आता आम्ही फक्त अलगीकरण कक्षातले लोक या ठिकाणी आहोत आज सकाळपासून पाणी आले आहे आणि बंदोबस्त वाढला आहे दैनिक तरुण भारत संवाद चे अगदी मनापासून आभार मानावे असे वाटते अनेक दिवसांपासून होणारा त्रास आमचा कमी झाला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








