दिवाळीत होणार नागरिकांचे हाल : मागण्या पूर्ण करण्याचे दिले निवेदन
प्रतिनिधी / सातारा
सानुग्रह अनुदान, बोनस व पगार वाढीचा दुसरा हप्ता दिवाळी पूर्वी द्यावा, अशा मागणीसाठी दि.14पासून लायटिंग स्ट्राईक आंदोलन पुकारण्यात येणार आहे, असा इशारा वीज कामगार संघटनेचे नानासाहेब सोनवलकर यांनी दिला आहे.त्यामुळे ऐन दिवाळीत जिल्हावासीयांना वीज पुरवठा खंडित होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे.
बोनस व सानुग्रह अनुदान मिळावे यासह पगार वाढीचा दुसरा हप्ता मिळावा या मागण्यासाठी उद्या दि.12रोजी राज्य व्यापी निषेध आंदोलन करण्यात येणार आहेत.तरीही प्रशासनाने निर्णय घेतला नाही तर दि.14 पासून लायटिंग स्ट्राईक पुकारण्यात येणार आहे.या आंदोलनात 20 संघटना सहभागी होणार असल्याचे सोनवलकर यांनी सांगितले. दरम्यान, या आंदोलनामुळे ऐन दिवाळीत नागरिकांना विजेच्या गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे.









