प्रतिनिधी/ पणजी
गोवा ही ‘पॅसिनो राजधानी’ म्हणून यापूर्वीच लोकांनी घेषित केली आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून अधिकृत मान्यता देण्याची गरज नाही. तरीही पॅसिनोंमुळे आर्थिक सुबत्ता मिळून गोव्याचा फायदा होत असेल तर आम्हीही निश्चितच गोव्याला ‘पॅसिनो राजधानी’ म्हणून घोषित करू, असे वक्तव्य केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी यांनी केले आहे.
पर्यटनाशी संबंधित विविध प्रकल्पांची उद्घाटने तसेच पर्यटन प्रोत्साहन योजना जाहीर करण्यासाठी गोवा भेटीवर आलेले केंद्रीय मंत्री श्री. रेड्डी शनिवारी पत्रकार परिषदेत बोलत होते. पणजीत पर्यटन भवनात आयोजित या पत्रकार परिषदेस केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, खासदार विनय तेंडुलकर व पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार दयानंद सोपटे यांची उपस्थिती होती.
कॅसिनोसाठीच लोक गोवा व सिक्कीममध्ये जातात
‘गोव्याला पॅसिनो राजधानी म्हणून घोषित करण्याची कोणतीही योजना आहे का?’ असे विचारले असता श्री. रेड्डी यांनी वरीलप्रमाणे उत्तर दिले. देशातील लोकांनी यापूर्वीच गोव्याला पॅसिनो राजधानी म्हणून मान्यता व पसंती दिली आहे. खरे तर पॅसिनोंसाठीच लोक गोवा आणि सिक्कीम या दोन राज्यामध्ये जातात. त्यामुळे केंद्र सरकारने गोव्याला ‘पॅसिनो राजधानी’ म्हणून घोषित करण्याची तशी आवश्यकता नाही. तरीही पॅसिनोमुळे गोव्याचा फायदा होत असेल तर आम्ही निश्चितच गोवा ही ‘पॅसिनो राजधानी’ म्हणून जाहीर करू, असे रेड्डी म्हणाले.
पर्यटनास जाताना मार्गदर्शक तत्वे पाळा!
पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्याला कोरोना संकटामुळे प्रचंड फटका बसला. त्यातून सावरताना आता देशी पर्यटक विविध ठिकाणी जाऊ लागले आहेत. गोव्यातही हजारो पर्यटक उतरले आहेत. त्यावरून पर्यटन क्षेत्र हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे दिसून येत आहे. तरीही आता कोरोनाच्या तिसऱया लाटेची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे लोकांनी देशात कुठेही पर्यटनास जात असाल तरी कोरोनासंबंधी प्रत्येक मार्गदर्शक तत्वांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.
तिसऱया लाटेवर यशस्वीरित्या मात करु!
या संकटावर मात करण्यासाठी प्रत्येक राज्य सरकारांनी सर्व तयारी ठेवली आहे. त्याचबरोबर नव्याने दाखल झालेला ओमिक्रॉन हा व्हायरस भारतात येऊच नये याची खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे प्रत्येक विदेशी पर्यटकाची कसून तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे तिसऱया लाटेच्या संकटावर मात करण्यात आम्ही यशस्वी होऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशात आतापर्यंत 125 कोटी लोकांना लस देण्यात आली आहे. त्याशिवाय विविध राज्यात मिळून 25 कोटी लसी उपलब्ध आहेत. डिसेंबर संपेपर्यंत लसींचे उत्पादन वाढविण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
गोव्यात क्रूझ पर्यटनावर अधिक भर देणार
देशात पर्यटनवाढीस चालना देण्यासाठी सुमारे 20 देशांमधील भारतीय दूतावासात पर्यटन अधिकारी नियुक्त करण्यात आले असून अधिकाधिक पर्यटकांना भारताकडे आकर्षित करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्याशिवाय केंद्र सरकार 75 पर्यटन स्थळांचा जागतिक दर्जा देऊन विकास करण्यावर काम करत आहे. त्यात गोव्याचाही समावेश असून येत्या दिवसात सागरमाला प्रकल्पांर्गत गोव्यात क्रूझ पर्यटनावर अधिक भर देण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा कृती आराखडा तयार करण्यासाठी लवकरच केंद्रीय पर्यटन आणि शिपिंग मंत्र्यांची बैठक होणार असल्याचे रेड्डी यांनी सांगितले.
दरम्यान, श्री. रेड्डी यांच्याहस्ते शुक्रवारी उत्तर गोव्यातील आग्वाद किल्ला, जुने गोवेतील सेंट पॅथेड्रल चर्च आणि कुर्डी येथील महादेव मंदिरात येणाऱयांसाठी निर्माण करण्यात आलेल्या सुविधा आणि विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले.









