ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पूर्व लडाखमधील सीमारेषेवर चीनने कोणत्याही प्रकारे आगळीक केल्यास उत्तर आणि पश्चिम सीमेवर एकाचवेळी युद्ध लढण्यास भारतीय हवाई दल सज्ज आहे, असे भारतीय हवाई दलाचे प्रमुख आर के एस भदौरिया यांनी म्हटले आहे.
येत्या आठ ऑक्टोंबरला असणाऱ्या ‘एअर फोर्स डे’च्या पार्श्वभूमीवर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
भदौरिया म्हणाले, पूर्व लडाखमधील सीमावादावरून भारत-चीनमध्ये मागील सात महिन्यांपासून तणाव कायम आहे. सीमारेषेवर दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. दोन्ही देशांनी युद्धसज्जता ठेवली आहे. यापूर्वी झालेल्या लष्करी स्तरावरील बैठकांमध्ये दोन्ही देशांनी तणाव कमी करण्यावर सहमती दर्शवली. पण चीन कुरघोड्या करू शकतो.
त्यामुळे भविष्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास उत्तर आणि पश्चिम सीमेवर एकाचवेळी दोन आघाड्यांवर युद्ध लढण्यास हवाई दल सज्ज आहे. हवाई दलात राफेलचा समावेश झाल्यामुळे भारताकडे खोलवर हल्ला करण्याची क्षमता प्राप्त झाली आहे, असेही भदौरिया म्हणाले.









