कोरोनामुळे बर्याच गोष्टी व्हर्च्युअल होऊ लागल्या आहेत. त्यातच आता नोकर्यांसाठी मुलाखतीही ऑनलाईन घेतल्या जात आहेत. मुलाखत ऑनलाईन किंवा घरी बसून द्यायची असली तरी तुम्हाला तयारी करावी लागणार आहे. नोकरी बदलण्याच्या विचारात असाल तर व्हर्च्युअल इंटरव्हयूसाठी तयार रहा. व्हर्च्युअल इंटरव्ह्यूच्या तयारीसाठी नेमकं काय करायला हवं? जाणून घेऊ.
* व्हर्च्युअल इंटरव्ह्यूसाठी आता गूगल मीट, हँग आउट, झूमसारख्या पर्यायांचा वापर होतो. तसंच उमेवाराची तांत्रिक क्षमता जोखली जाते. त्यामुळे मुलाखतीदरम्यान तांत्रिक अडचणी येणार नाहीत, याची पूर्ण काळजी घ्या. लॅपटॉप आधीच चार्ज करून ठेवा. इंटरनेट कनेक्टिविटी योग्य असल्याची खात्री करून घ्या. मुलाखतीदरम्यान तुमच्याकडून कोणतीही चूक होता कामा नये.
* मुलाखत व्हर्च्युअल असली तरी ती घेणारे उमेदवारांना जोखत असतात. कॅमेर्यात आपल्या आसपासच्या वस्तू दिसतात. यावरून तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज येतो. मुलाखतीसाठी बसताना मागे फार पसारा नसावा. मागे भिंत असेल तर छानसं चित्र लावता येईल. तुम्ही एखादं पुस्तकही ठेऊ शकता. कोणतीही चुकीची वस्तू मुलाखतकाराच्या नजरेत येणार नाही याकडे लक्ष द्या.
* मुलाखतीदरम्यान भरपूर प्रकाश असणार्या तसंच हवा खेळती असणार्या खोलीत बसा. यामुळे तुम्हाला खूप उत्साही वाटेल. खोलीचं दार आणि खिडक्या बंद करा. टिव्ही बंद करा. मोबाईल सायलेंट ठेवा. लक्ष विचलित होईल, असं काहीही करू नका. * कंपनीची माहिती घेऊन ठेवा. यामुळे तुम्ही कंपनीला काय देऊ शकता हे सांगता येईल.









