काजोलची बहिण अभिनेत्री तनीषा मुखर्जीचा आगामी चित्रपट ‘कोड नेम अब्दुल’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. तनीषाने स्वतःच चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केला आहे. याच्या कॅप्शनमध्ये तिने ‘हा आहे माझ्या चित्रपटाचा दीर्घकाळापासून प्रतीक्षित ट्रेलर’ असे म्हटले आहे.

ईश्वर गुंतुरु यांच्या दिग्दर्शनाच्या अंतर्गत निर्माण या चित्रपटात तनीषा सोबत अक्कू कुल्हारी, अशोक चौधरी आणि खटेरा हकीमी हे कलाकार दिसून येणार आहेत. चित्रपटाची निर्मिती हिमांगी शाह यांनी केली आहे. या स्पाय थ्रिलर चित्रपटाला 10 डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे
तनीषा काजोलप्रमाणे बॉलिवूडमध्ये यशस्वी ठरलेली नाही. अभिनयाच्या उलट तनीषा ही चंदेरी दुनियेत वादग्रस्त गोष्टींसाठी चर्चेत राहिली आहे. बिग बॉसमधील तिचे अरमान कोहलीसोबतचे अफेयर चांगलेच चर्चेत राहिले होते. तनीषा मागील काही काळात बिग बजेट चित्रपटांमधून जवळपास गायब झाली होती.









