टेक्सास
अमेरिकेतील आयफोनमध्ये अग्रेसर कंपनी ऍपलवर 839.95 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. अमेरिकेतील 36 राज्यांनी केलेल्या तक्रारीनंतर दंड ठोठावण्यात आल्याचे सांगण्यात येते. सध्याला ऍपलचे जुने फोन खूपच मंद गतीने कार्यरत होते. याबाबत अनेकांनी तक्रार केली होती. कंपनीने जुन्या फोन्सचा वेग जाणून-बुजून कमी केल्याचा आरोप करण्यात आला. त्याचप्रमाणे बॅटरीशी संबंधित काही गोष्टी कंपनीने लपवण्याचा प्रयत्न केला असल्याचे समोर आले आहे.









