आरोपींना घेऊन पथक दाखल
कोल्हापूर / वेब टीम
गेल्या आठवड्यात चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडीतील एमडीएम ड्रग्स सापडल्याने संपूर्ण राज्यभर खळबळ माजली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी राजकुमार अर्जुनराव राजहंस व केअरटेकर निखिल लोहारला घेऊन मुंबईतुन अटक झाली होती. आज आरोपींसह अमली पदार्थ विरोधी पथक चंदगडमध्ये दाखल झाले आहे. याची स्थानिक वर्तुळामध्ये मोठी चर्चा सुरू झाली असून, मोठे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याबाबत बुधवारी अधिक खुलासा होण्याची शक्यता आहे.
संपूर्ण राज्यभर खळबळ माजविणाऱ्या चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडी ड्रग्स प्रकरणातील आरोपी राजकुमार राजहंसला घेऊन मुंबई पोलीस पून्हा चंदगडमध्ये दाखल झाले आहे. आरोपींना घेऊन चंदगड मधील काही भागात सर्च ऑपरेशन करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडी गावातून 2 कोटी 35 लाख रुपयांच ड्रग्स बनवण्याचं साहित्य जप्त करण्यात आले होते.
या प्रकरणातील आतापर्यंत मास्टरमाईड असणारा वकील राजकुमार राजहंस, केअरटेकर निखिल लोहार आणि मुंबईतील महिला ड्रग्स पेडलर्स ख्रिस्थियाना याना अटक करण्यात आली होती. यापैकी वकील राजकुमार राजहंस, केअरटेकर निखिल लोहार यांना घेऊन मुबंई अंमली विरोधी पथक आता पुन्हा एकदा चंदगडमध्ये दाखल झाले आहे. मुंबई पोलिसांच्या चंदगडमध्ये होणाऱ्या दुसऱ्या फेरीच्या तपासात महत्वाचे धागेदोरे हाती मिळण्याची शक्यता आहे. आज दुपारी दाखल झालेले पथक साडेतीन वाजता बेळगाव कडे रवाना झाले असून यात बडे मासे अडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.









