ज्वारी, काजूच्या पिकांवर परिणाम होण्याची शक्यता
वार्ताहर / किणये
तालुक्मयात ढगाळ वातावरणाचे सावट कायम असून गुरुवारी सायंकाळी गडद वातावरण निर्माण झाले होते. यामुळे शेतकरीवर्गामध्ये चिंता पसरली आहे. ज्वारी, काजू, आंबा व भाजीपाला पिकांवर याचा परिणाम होणार असल्याची भीती शेतकऱयांना लागून राहिली आहे.
गेल्या पंधरा-वीस दिवसात तालुक्मयात दोन ते तीन वेळा वळीव पावसाने हजेरी लावली आहे. या वळीव पावसात रब्बी हंगामातील पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.
रब्बी हंगामातील जोंधळय़ाची कणसे धरुन त्याची मळणी करण्याची कामे शिवारात सुरू आहेत. मात्र, वळीव पाऊस व ढगाळ वातावरणामुळे ज्वारीची बरीच कणसे खराब झाली आहेत. यामुळे ज्वारीच्या उत्पादनात घट होणार असून उत्पादक शेतकऱयांना याचा फटका बसला आहे.
काजू व आंब्याच्या झाडांना बऱयापैकी फळधारणा सुरू झाली आहे. मात्र, सततच्या हवामानातील बदलामुळे झाडांना बहरून आलेला मोहोर खराब होऊ लागला आहे. गेल्या आठ दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱयाच्या पावसामुळे काजू व आंब्याच्या झाडांवरील लहान फळे गळून पडली होती. यामुळे काजू व आंब्याच्या उत्पादनातही घट होणार असल्याने बागायतदार शेतकरी अडचणीत आला आहे.
तालुक्मयाच्या सर्रास भागात उन्हाळय़ात विविध प्रकारची भाजीपाला पिके घेण्यात येतात. वळीव पावसामुळे कोथिंबीर, लालभाजी, मिरची आदी पिकांचे नुकसान झाले होते. तर ढगाळ वातावरणामुळे ही पिके खराब होऊ लागली आहेत. गुरुवारी रात्री तालुक्मयाच्या काही भागात पावसाची रिमझिमही झाली. त्यामुळे शेतकऱयांच्या चिंतेत भर पडली आहे









