भाजपा प्रदेशाध्यक्षांकडून नगरसेवकांची कानउघडणी, जंक्शनसमोरील ड्रेनेजच्या पाण्यामुळे नागरिकांची निदर्शने
प्रतिनिधी/मिरज
शहरातील पहिल्या ‘ट्रीमिक्स’ रस्ता कामाचा शुभारंभ गुरूवारी अक्षरश दुर्गंधीयुक्त ड्रेनेजच्या पाण्यात पार पडला. यामुळे संतफ्त झालेल्या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी उपस्थित नगरसेवकांची चांगलीच कानउघडणी केली. जंक्शनसमोरील खोकीधारक, रिक्षा चालक आणि प्रवाशांनी यावेळी निदर्शने करुन आपल्या भावना मांडल्या. परिसरातील दुर्गंधीमुळे काही मिनिटातच उद्घाटनाचे सोपस्कार पार पडले.








