स्मार्ट सिटी योजनेतील विकासकामे निकृष्ठ
प्रतिनिधी/ बेळगाव
स्मार्ट सिटी योजनेतील विकासकामे निकृष्ठ दर्जाची होत असलेली तक्रार वारंवार करण्यात येत आहे. मात्र या तक्रारींकडे स्मार्ट सिटी कंपनीच्या कार्यकारी संचालकांनी कानाडोळा केला आहे. त्यामुळे डेनेज चेंबरचे बांधकाम वाळू किंवा एम-सँड ऐवजी चिपिंग घालून करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे हे बांधकाम दर्जेदार होईल का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
स्मार्ट सिटी योजनेमधून विविध विकासकामे राबविण्यात येत आहेत. श्रीनगर परिसरातील रस्त्याचा विकास करण्याचे काम सुरू करून अडीच वर्षे उलटली तरी देखील येथील कामे अर्धवट स्थितीत आहे. अनेक ठिकाणी गटारीचे बांधकाम रखडले आहे. काही ठिकाणी फुटपाथचे काम अर्धवट आहे. करण्यात आलेली कामे देखील निकृ÷ दर्जाची असल्याची तक्रार स्मार्ट सिटी कंपनीकडे करण्यात आली आहे. श्रीनगर येथील महापालिकेच्या व्यापारी संकुलासमोर भिंत बांधून फुटपाथ तयार करण्यात आले आहे. पण सदर काँक्रिटच्या भिंतीला तडे गेल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच गटारीच्या काँक्रिटला देखील भेगा पडल्याचे दिसून आले होते. त्यामुळे याबाबत येथील माजी नगरसेवक डॉ. दिनेश नाशीपुडी यांनी तक्रार केली होती. सदर बांधकाम निकृ÷ दर्जाचे असल्याची बाब स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांच्या निदर्शनास आणुन दिली होती.
वाळू व एम सँड वापरण्याऐवजी चक्क चिपिंगचा वापर
ड्रेनेज वाहिन्या घालताना काँक्रिटी घालण्याऐवजी थेट वाहिन्या घालण्यात येत असल्याने याबाबतही तक्रार करण्यात आली होती. पण स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांसह कार्यकारी संचालकांनी देखील कानाडोळा केला आहे. येथील कामे संथगतीने सुरू आहेत. तसेच कामे निकृ÷ दर्जाची झाल्याची बाब आढळून आली आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत वाहिन्या घालण्याबरोबर डेनेज चेंबर उभारणीचे काम सुरू आहे. पण सदर कामे व्यवस्थित होत नसल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. डेनेज चेंबर बांधण्याकरीता वाळू व एम सँड वापरण्याऐवजी चक्क चिपिंगचा वापर करण्यात येत असल्याची बाब चव्हाटय़ावर आली आहे. त्यामुळे हे चेंबर टिकणार का? असा मुद्दा उपस्थित झाला आहे.
बांधकाम व्यवस्थित नसल्याने डेनेज चेंबर खराब होण्याचा धोका
चेंबरचे बांधकाम करून त्यावर सिमेंट काँक्रिटचे झाकण ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वजनदार झाकण आणि झाकणाच्या कॉलरचे वजन चिपिंगमध्ये बांधण्यात आलेली भिंत पेलेल का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. सदर बांधकाम व्यवस्थित होत नसल्याने डेनेज चेंबर खराब होण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे या कामाची पाहणी करून दर्जेदार कामे करण्यासाठी कंत्राटदारांना सूचना करण्यात याव्यात, अशी मागणी माजी नगरसेवक डॉ. दिनेश नाशिपुडी यांनी केली आहे. जर कामे दर्जेदार न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी दिला आहे..









