सिंगापूर
सिंगापूरमधील न्यायालयाने गांजा तस्करी प्रकरणी 2 मूळच्या भारतीयांवरील मृत्युदंडाची शिक्षा कायम ठेवली आहे. द स्टेट्स टाईम्सने ही माहिती दिली आहे. गांजा तस्करी प्रकरणी दोघे मूळचे भारतीय दोषी ठरविले गेले होते. मलेशियातील कमलनाथन मुनिअंडी (वय 27) व सिंगापूरमधील के. चंद्रू सुब्रम्हण्यम (वय 52) यांच्यावर तस्करीचा आरोप सिद्ध झाला आहे. या प्रकरणातील तिसऱया मूळच्या भारतीय प्रविनाश (मलेशिया) याने केलेला दावा तेथील न्यायालयाने फेटाळून लावला आहे. याबाबतची माहिती अशी की, 5 मार्च 2016 ला कमलनाथन व प्रविनाश वुडलँड चेकपॉईंट मार्गावरून सिंगापुरात दाखल झाले होते. करांजी एमआरटी (रेल्वे) स्टेशनजवळ आल्यावर त्यांना ड्रग्ज देण्यात आले. ते दोघे जवळच्या एका कॉफी शॉपवर गेले. तेथे कमलनाथनने सुरेन नावाच्या व्यक्तीला बोलावलं. मग करांजी रोडवर चंद्रूशी संपर्क साधला. ज्याने यांना पैसे व रिकाम्या प्लास्टीक बॅग दिल्या. त्याचवेळी तिघांना नार्कोटिक्स विभागाने ताब्यात घेतले. त्यानंतर वरील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांच्यावर दोषारोप सिद्ध झाले.









