बेंगळूर/प्रतिनिधी
केंद्रीय गुन्हे शाखेने (सीसीबी) ड्रग रॅकेट प्रकरणात अटक केलेल्या अभिनेत्री रागिणी आणि संजना व्यतिरिक्त १३ आरोपींविरूद्ध आरोपपत्र दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.
सीसीबीने गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने तपास सुरू ठेवण्याचे ठरविले आहे. रागिनी आणि संजनाच्या मित्रांचे जबाब व तांत्रिक पुरावे यावर आधारित सातत्याने प्रथम टप्प्यातील आरोपपत्र दाखल करून, तपास सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. सीसीबी ड्रग्ज रॅकेट प्रकरणात रागिणी आणि संजनाच्या सहभागाचा उल्लेख करेल. यासह मुख्य आरोपी आदित्य अल्वा,रागिणीचा मित्र शिवप्रकाश आणि फरार असलेल्या अन्य आरोपींचा उल्लेखही असेल.
ड्रग्ज रॅकेटमधील संजना आणि रागिणी व्यतिरिक्त रविशंकर, राहुल, विरेन खन्ना आणि नायजेरियातील चार नागरिकांसह १५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
तसेच अभिनेते दिगंत, पत्नी आंद्रिता राय, फॅशन डिझायनर गुरु रमेश, नेते कार्तिक राज, रॉकी राय, निर्माते सौंदर्य जगदीश आणि इतरांच्या वक्तव्यांचा आरोप आरोपपत्रात उल्लेख केला जाणार आहे.
फरार आरोपींमध्ये आदित्य अल्वा, शिवप्रकाश, प्रशांत राज, मोहम्मद मोहसीन आणि अभि स्वामी यांचा समावेश आहे. कोणत्याही बाबतीत एफआयआर नोंदविल्यानंतर तीन महिन्यांत न्यायालयात आरोपपत्र दाखल करावे लागते. ८ सप्टेंबर रोजी सीसीबीचे सहायक पोलीस आयुक्त गौतम यांनी कॉटनपेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यानंतर रागिणी आणि विरेन खन्ना यांना अटक करण्यात आली.









