ऑनलाईन टीम / मुंबई :
ड्रग्ज प्रकरणी समन्स मिळाल्यानंतर बॉलीवुड अभिनेता अर्जुन रामपाल चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात हजर झाला आहे. यापूर्वी अर्जुन रामपाल यांची मैत्रीण गॅब्रिएला डेमेट्रियड्स हिची एनसीबीने दोनवेळा चौकशी केली. यावेळी अभिनेता अर्जुन रामपाल यालाही चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले होते. त्यानंतर आज तो हजर झाला असूून अर्जुनची कसून चौकशी केली जात आहे.

- अर्जुनचा मित्र पॉल बार्टेलला अटक

दरम्यान, एनसीबीकडून सुरू असलेल्या बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणाच्या तपासला आता वेग आला आहे. अर्जुन रामपालच्या हालचालींवर लक्ष ठेवून असणाऱ्या एनसीबीने मोठी कारवाई केली आहे. अर्जुन रामपालचा मित्र पॉल बार्टेलला एनसीबीने अटक केली आहे.
पॉल हा ऑस्ट्रेलियन असून, तो एका मोठ्या बांधकाम कंपनीत काम करतो. तो आर्किटेक्ट आहे. त्याचप्रमाणे एनसीबी अधिकाऱ्यांनी अर्जुन रामपालच्या घरी सोमवारी धाड टाकली होती. यावेळी काही प्रतिबंधित औषधांच्या गोळ्या त्या ठिकाणी सापडल्या होत्या. या गोळ्याबाबत योग्य तो खुलासा न केल्यास अर्जुन रामपालला अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.









