बेंगळूर/प्रतिनिधी
मंगळूर सेंट्रल क्राइम ब्रँचने (सीसीबी) ड्रग रॅकेट प्रकरणी टीव्ही अँकर आणि कन्नड अभिनेत्री अनुश्रीला गुरुवारी नोटीस
जावली.
सूत्रांच्या माहितीनुसार, सीसीबी पोलिसांनी सुरुवातीला ही सूचना अनुश्रीच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठविली होती आणि शुक्रवारी सीसीबीच्या टीमने अनुश्रीला वैयक्तिकरित्या ही नोटीस पाठवली आहे. ती आता आई आणि भावासोबत बेंगळूरमध्ये राहत आहे.
मंगळूर सीसीबी पोलिसांनी १९ सप्टेंबर रोजी ड्रग प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात कोरिओग्राफर-अभिनेता किशोर अमन आणि त्याचा साथीदार अखिल नौशील यांना अटक केली होती.