जागा निवडून आणणे त्यांच्यासाठी आवाहन :आपण मुंबईत गेलो, दिल्लीबाबत आपली अफवा
प्रतिनिधी /म्हापसा
डॉ. प्रमोद सावंत आजही आमच्या सारखे शिकत आहे. आम्ही 10 वर्षे आमदार आहोत तरीपण आजही आम्ही शिकत आहोत. विधानसभेचे विविध कायदे आहेत. मला सर्व कायदे माहीत नाही पण आपल्यास उपसभापती कार्यकारी सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली. अचानकपणल्व. पर्रीकरांचे निधन झाले म्हणून डॉ. प्रमोद सावंत मुख्यमंत्री झाले. ते मुख्यमंत्री होणार म्हणून त्यांनी निवडणूक लढविली नाही. ही योग्य वेळ आहे जर पक्ष डॉ. प्रमोद सावंत त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी निवडणुकीत पुढे जात आहे तर त्यांना ही आव्हानात्मक वेळ आहे आणि त्यांना आपले नेतृत्व दाखविण्यासाठी आवाहन आहे. पक्ष डॉ. प्रमोद सावंत यांना नेतृत्व करण्याचे आगामी निवडणुकीत व्यासपीठ देत असल्यास त्यांना आपण किती जागा निवडून आणणार हे सिद्ध करून दाखवावे लागणार अशी माहिती कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी दै. ‘तरुण भारत’शी बोलताना दिली.
आपल्यासह अन्य काही आमदार वॉमंग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी एकच चर्चा राज्यात आहे हे कितपत खरे आहे असे मंत्री लोबो यांना विचारले असता ते म्हणाले की, प्रत्येक राजकीय पक्ष आहे. जे कोण आमदार आहेत आम्ही प्रसारमाध्यमाजवळ स्पष्ट बोलतो काही गप्प बसतात. खूप आमदारांकडे बोलणी असतात. आम्हालाही खूप पक्ष संपर्क साधतात पण आम्ही कितपत जाणार काय करणार हे पहावे लागणार. आपण दिल्ली नाही तर मुंबई येथे आपल्या वैयक्तिक कामासाठी गेलो होतो. दिल्लीत गेलो ही बातमी चुकीची आहे. आपले काही काम होते त्यासाठी आम्ही पती पत्नी गेलो होतो मात्र प्रसार माध्यमानी नाहक वेगळेच छापले.
लोकांच्या मागण्या आणि त्यांना काय पाहिजे हे जाहीरनाम्यात घालून पुढील निर्णय
आम्हाला पक्षात मान आहे. आम्हाला 15 वर्षे झाली आणि अन्य कुणाला 30 वर्षे झाली असा भेदभाव नको. एकवेळ माणसाची येते तेव्हा आम्ही अंतिम निर्णय घ्यायला पाहिजे. आम्ही स्व. मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपात रुजू झालो होतो. दोन्हीही वेळ आम्ही त्यांच्या बरोबर होतो. पुढील काळात आम्ही पाऊल कसे टाकावे गोव्यातील जनतेला काय पाहिजे, आमच्या मतदारसंघाच्या बार्देशच्या उत्तर गोव्याच्या जनतेला काय पाहिजे, आमच्या मतदारसंघाच्या बार्देशच्या उत्तर गोव्याच्या जनतेला काय पाहिजे हे आम्हाला पहावे लागेल. जाणून घ्यायला पाहिजे. आणि लोकांच्या मागण्या काय आहे आणि आम्ही काय लोकांना देणार आहोत हे सर्वकाही लक्षात घेऊन आम्ही पुढील जाहीरनाम्यात घालणार आहोत व नंतर आम्ही निर्णय घेणार असल्याची माहिती मंत्री मायकल लोबो यांनी दै.‘तरुण भारत’शी बोलताना दिली.
पुढील निर्णय आम्ही पती पत्नी घेणार
ते म्हणाले आता आपण भाजपचा सदस्य आहे. पुढील निर्णय आम्ही पती पत्नी बरोबर घेणार आहोत. कारण आम्ही दोघेही काम करीत आलो आहोत. 15 वर्षाच्या कालावधीत डिलायला पंचायत सदस्य सरपंच महिला सदस्य भाजपा म्हणून काम करीत आहेत. त्या शिवोलीतील सर्व नागरिकांना भेटल्या आहेत. शिवोलीतील नागरिकांनी त्यांना पुढे काढले आहे. लोकांना पाहिजे तर त्या निवडून येणार अन्यथा घरी पाठविणार.
आम्ही दोघांनी पक्षासाठी काम केले
भाजप पक्ष सोडणे तुमच्यासाठी काळाची गरज आहे काय? असा प्रश्न त्यांना केला असता ते म्हणाले की, पक्ष सोडण्याबाबत आपण काहीच बोललो नाही. आम्हाला या पक्षात 15 वर्षे झाली. आम्ही स्व. मनोहर पर्रीकरांच्या कारकीर्दीत भाजपात रुजू झालो. आज पर्रीकर नाही. भाजपात आम्ही काम करीत असताना पर्रीकरांनी आम्हाला जे स्वप्न दाखविले होते त्यांच्याबरोबर राहून आम्हाला काम करायला संधी मिळाली. आपण जिल्हा पंचायत सदस्य होतो. डिलायला महिला व्हींगच्या सदस्य होत्या. दोघानीही पक्षासाठी काम केलेले आहे. 2009 जिल्हा पंचायत सदस्य 2012 मध्ये आमदार झालो, आम्ही लोकांबरोबर राहून काम केलेले आहे. लोकांना पाहिजे ते आम्हाला द्यायला पाहिजे असे लोबो म्हणाले.









