मुंबई \ ऑनलाईन टीम
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या केल्या प्रकरणातला आरोपी विक्रम भावे याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. भावे सध्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात तुरुंगवासात आहे. एक लाख रुपये भरल्यानंतर त्याची सुटका होणार आहे.
25 मे 2019 रोजी पोलिसांनी विक्रम भावे याला अटक केली होती. सीबीआयने त्याच्यावर मारेकऱ्यांना रेकी करण्यासाठी मदत केल्याचा आरोप ठेवला होता. तेव्हापासून विक्रम भावे तुरुंगात होता. मात्र, आज उच्च न्यायालयाने विक्रम भावे याला एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला. जामीन मिळाल्यानंतर विक्रम भावेला साधारण आठवडाभर पोलीस ठाण्यात रोज हजेरी लावावी लागणार आहे. त्यानंतर पुढील दोन-तीन महिन्यांसाठी त्याला आठवड्यातून दोनदा आणि त्यानंतर आठवड्यातून एकदा अशाप्रकारे पोलीस ठाण्यात हजर राहावे लागेल. तसेच विक्रम भावेला न्यायालयाच्या कार्यक्षेत्राबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








