सांगली / प्रतिनिधी
येथील पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्या डॉ. दीपा रवींद्र श्रावस्ती- पवार यांना नुकतीच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने विद्यावाचस्पती (पीएच.डी.) ही पदवी प्रदान केली. त्यांनी ‘बुद्धिझम: द ओरिजिन ऑफ फेमिनिझम’ या विषयावर आपला संशोधन प्रबंध सादर केला असून ज्येष्ठ अभ्यासक डॉ. प्रदीप आगलावे हे त्यांचे मार्गदर्शक होते.
लेखिका डॉ. दीपा श्रावस्ती या मुळात वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी बी. ए. एम. एस. व आहारशास्त्रातील पदव्युत्तर पदविका प्राप्त केली आहे. परिवर्तनवादी चळवळीतील सहभागामुळे पुढे त्यांनी नागपूर विद्यापीठातून ‘डॉ. आंबेडकर थॉट्स’ या विषयातील एम. ए. ही पदवी प्राप्त केली. तसेच त्या ‘बुद्धिझम, जैनिझम, गांधी विचार आणि शांतता अभ्यास’ या विषयातून नेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत.
त्यांची यापूर्वीच ‘स्त्री-स्वातंत्र्य आणि बुद्ध-फुले-आंबेडकर’, तसेच ‘पेरियार का नारीवाद’ ही दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. अनेक नियतकालिकांमधून त्यांचे विविध विषयांवरील लेख प्रकाशित झाले आहेत. महिला सक्षमीकरण, बुद्ध-फुले-शाहू आणि आंबेडकर हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत. ‘डॉ. आंबेडकरांच्या चळवळीतील स्त्रिया’ हे त्यांचे आगामी पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे. शिवाजी विद्यापीठाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या अभ्यासक्रमांसाठी अभ्यागत व्याख्याता म्हणून त्या कार्यरत आहेत.तसेच त्या बामसेफ संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल पुरोगामी विचारवंत डॉ. बाबूराव गुरव, प्रा. एस.डी.पवार, डॉ. श्रीकृष्ण महाजन आदी मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








