ऑनलाईन टीम / पुणे :
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेच्या वतीने, कै. डॉ. गं. ना. जोगळेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, दरवर्षी मराठी वाङमय क्षेत्रातील बहुमोल योगदानाबद्दल मानाचा पुरस्कार दिला जातो. मराठीच्या अध्यापनाबरोबरच वाड्मयेतिहासाचे तत्त्वज्ञान या विषयासाठी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल डॉ. द. दि. पुंडे यांना यावर्षीचा महाराष्ट्र साहित्य परिषदेचा डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे, अशी माहिती कार्यवाह बंडा जोशी यांनी दिली.
ते म्हणाले, या पुरस्काराचे वितरण शुक्रवार दि. 14 ऑगस्ट रोजी डॉ. पुंडे यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यावेळी मसापचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, पराग जोगळेकर आणि उज्वला जोगळेकर उपस्थित राहणार आहेत.