ऑनलाईन टीम / पुणे :
समाजसेवा हाच परमोधर्म मानणाऱ्या, समाजात उल्लेखनीय कार्य केलेल्या आणि कोरोना काळात समाजासाठी बहुमूल्य योगदान दिलेल्या डॉ.गौतम छाजेड आणि जावेद खान यांना नादब्रह्म पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. सदाशिव पेठेतील भरत नाटय मंदिर येथे सोमवार, दिनांक 22 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती पथकाचे संस्थापक अध्यक्ष अतुल बेहेरे यांनी दिली.
पुरस्कार वितरण रा.स्व. संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आमदार माधुरी मिसाळ, बाळासाहेब दाभेकर, प्रवीण परदेशी, गणेश घुले, अंकुश काकडे, अण्णा थोरात, दत्ता सागरे, पराग ठाकूर आदी उपस्थित राहणार आहेत.
अतुल बेहेरे म्हणाले, कार्यक्रमात चंद्रकांत सणस, पुनीत बालन, दीपक मानकर, यु. टी. पवार, अजय खेडेकर, राजाभाऊ भिलारे, धीरज घाटे, आनंद सराफ, शिरीष मोहिते, आनंद सागरे, निरंजन दाभेकर, वसंत मोरे, सचिन जामगे, समीर धनकवडे, ॠषीकेश बालगुडे, सुनील पांडे व छाया गायकवाड यांना संजीवनी नादब्रह्म पुरस्कार देऊन गौरवण्यांत येणार आहे. सन्मानपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.