प्रतिनिधी / वैराग
गेल्या तीन वर्षांपासून पवित्र पोर्टल मार्फत चालु असलेली प्रलंबित शिक्षक भरतीची पुढील निवड यादी तात्काळ लावून सर्व अभियोग्यता धारक शिक्षक बांधवांना न्याय द्यावा. यासाठी गुरूवारी पुर्ण महाराष्ट्रात राज्यव्यापी प्रलंबित शिक्षक भरती जवाब दो ! म्हणत डी.एड ,बी.एड बेरोज़गारांनी प्रलंबित शिक्षक भरती साठी आक्रोश आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
या अंदोलनाद्वारे महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील निस्वार्थपणे काम करणारे अभियोग्यता धारकांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पुणे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांच्या लेटर पॅड वर प्रत्येक शिक्षणाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रलंबित शिक्षक भरतीची पुढील निवड यादी जाहिर करा. या मागणीचे निवेदन दिले आहे. या निवेदनाची प्रतिलिपी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार , शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, शिक्षणराज्यमंत्री बच्चु कडु यांना देण्यात आली. या निवेदनावर पवित्र पोर्टल अंतिम लढा ग्रुप चे अध्यक्ष रहेमान पठाण आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पुणे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांची स्वाक्षरी आहे. याच अनुशंगाने आज सोलापूर येथे .संतोष ढोणे,.गणेश चव्हाण ,राजश्री महिंद्रकर,
सतीश सलगर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
शासन पवित्र पोर्टल मार्फत २०१७ पासुन शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवित असुन 3 वर्ष उलटून गेली तरी ही भरती पुर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे या उमेदवारांनी स्वतः ची गुणवत्ता सिद्ध केली असुन पुढील निवड यादीची वाट पाहत आहेत. परंतु शासनाने कोरोना चा बहाना करुन पुढील निवड यादी थंबवली आहे. सन. २०१७ ला घोषित केलेल्या १२००० पैकी ५८०० उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे आणि बाकीची यादी प्रलंबित आहे.
या आंदोलनाचा एक भाग म्हणुन आज दिवसभर सर्व अभियोग्यता धारकांच्या वतीने ट्विटर वर प्रलंबित शिक्षक भरती जवाब दो ! हा हैशटैग पण ठेवण्यात आला होता. त्याला दिवसभर लाखो ट्वीट्स करण्यात आले. त्याचबरोबर जर तात्काळ निवड यादी लाऊ शकत नसाल तर आम्हाला आत्महत्येची परवानगी द्या? अश्या आशयाचे ई मेल मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांना केले आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








