वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील प्रवासी वाहन विक्री डिसेंबर महिन्यात 1.24 टक्क्यांनी घसरुन 2 लाख 35 हजार 786 यूनिटवर विक्री स्थिरावली आहे. डिसेंबर 2018 मध्ये हा आकडा 1 लाख 38 हजार 753 इतका राहिला होता. मागील डिसेंबरमध्ये कारची विक्री 8.4 टक्क्यांची घसरण नोंदवली असून 1 लाख 42 हजार 126 कारची विक्री झाली आहे. डिसेंबर 2018 रोजी हा आकडा 1 लाख 55 हजार 159 यूनिटवर राहिला आहे. ही आकडेवारी सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चर्स (एसआयएएम) यांच्याकडून शुक्रवारी सादर करण्यात आली आहे.
व्यावसायिक वाहनांची विक्री 12.32 टक्क्यांनी घटून 66,622 राहिली आहे. सर्व प्रकारच्या वाहनांची एकूण विक्री 13.08 टक्क्यांनी कमी झाल्याचे पहावयास मिळाले आहे. यात 16 लाख 17 हजार 398 (डिसेंबर) च्या तुलनेत 14 लाख 5 हजार 776 विक्री झाली आहे.
2019 मध्ये वाहन विक्री 13.77 टक्क्यांनी घटली
2019 या संपूर्ण वर्षात प्रवासी वाहन विक्री 12.75 टक्क्यांनी घटली आहे. मागील वर्षात एकूण 29 लाख 62 हजार 52 वाहन(प्रवासी) विकले आहेत. 2018 रोजी हा आकडा 33 लाख 94 हजार 790 यूनिटवर राहिली आहे. यात सर्व प्रकारच्या वाहनांची एकूण विक्रीत 13.77 ने कमी आली आहे.








