ऑनलाईन टीम / मुंबई :
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर सातत्याने घोटाळ्यांचे आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आणखी तीन नेते आपल्या रडारवर असल्याचे म्हटले आहे. सोमय्या यांनी आज सकाळीच एक ट्विट केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ”ठाकरे सरकारच्या 3 नेत्यांचे घोटाळे डिसेंबरमध्ये उघड करणार…. उद्या मी अमरावती आणि परवा जालन्यात असणार”, असे ट्विट त्यांनी केले आहे.
दरम्यान, काल एका पत्रकार परिषदेत सोमय्या म्हणाले होते की, ठाकरे सरकारने जागा बळकावण्याचे काम केले आहे. 11 नोव्हेंबरला मी पहिला घोटाळा बाहेर काढला. आता आणखी काही घोटाळे बाहेर काढणार असून, येत्या 31 डिसेंबरपर्यंत अलीबाबा आणि 40 चोराचा हिशोब लोकांपुढे ठेवणार आहे.