पडताळणी सुरु – आवाजावर आधारीत पेमेन्ट सुविधा
नवी दिल्ली
नॅशनल पेमेंटस् कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) आता कमी कनेक्टिव्हिटी झोनमध्ये राहणाऱया मोबाइल फोन ग्राहकांसाठी व्हॉईस बेस्ड पेमेन्ट सर्व्हिसची सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
नियमित पेमेंट सेवा आणि या नव्या पेमेंट सेवेत फरक हा आहे की फीचर फोन ग्राहकांना आपल्या देवाणघेवाणीचे व्यवहार करण्यासाठी स्थिर इंटरनेटचे कनेक्शन असायलाच हवे असे काही नसणार आहे.
सुरूवातीला याबाबतची चाचणी करण्यात येत आहे. एकदा का या सेवेबाबतची पूर्ण खात्री झाली की सदरची सेवा पूर्णपणे वापरण्यासाठी अंमलात आणली जाणार आहे. पण याकरीता रिझर्व्ह बँकेची परवानगी आवश्यक असणार आहे. सदरची सेवा देण्यासाठी बेंगळूरची फिनटेक कंपनी उबोना टेक्नॉलॉजी खासगी क्षेत्रातील बँकेची मदत घेत आहे.
यामध्ये राहणार एकच पिन
व्हॉईसवर आधारीत पेमेन्ट सेवेकरीता फोन ग्राहकांना मर्चंट पेमेन्टसोबत देवाण घेवाणीस अनुमती मिळणार आहे. सुरक्षेसाठी एकच पिन राहणार आहे.









