डिचोली/प्रतिनिधी :
डिचोली ते म्हापसा या महामार्गावर बोर्डे डिचोली येथील साष्टीवाडा येथे व्हेगन आर कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीचालक मूळ उत्तर प्रदेशचा युवक जागीच ठार झाला. एका कारला ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीने थेट कारला जोरदार धडक दिली. हि धडक इतकी जबरदस्त होती की दुचाकीचालकाचा उजवा हात तुटून अपघातग्रस्त कारच्या आत डेशबोर्डवर पडला, तर दुचाकीचालक सोहरब खान हा घटनास्थळावरून सुमारे तीस मीटर उंचावरून दुर फेकला गेला आणि जागीच गतप्राण झाला.
सदर अपघात काल शनिवारी (दि. 11 जाने.) दुपारी पाऊणे एक वाजण्याच्या सुमारास घडला. डिचोलीहून म्हापसाच्या दिशेने जाणाऱया जीए 03 टी 7236 हि व्हेगन आर कारवर म्हापसातून डिचोलीच्या दिशेने येणाऱया जीए 07 व्हाय 4786 या डय़?क या मोटरसायकलने इतर वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात जबरदस्त धडक दिली. या धडकेत दुचाकी गाडीचा चुरडा झालाच शिवाय दुचाकीचालक सोहरब खान (मूळ उत्तर प्रदेश, सध्या राहणारा मंडूर डोंगरी) हा युवक घटनास्थळावरून सुमारे तीस मीटर अंतरावर उसळून पडला.
उजवा हात तुटून कारच्या डेशबोर्डवर
समोरील इतर एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात सोहरब याने वाढविलेला गाडीचा वेग हा नियंत्रणा बाहेरील होता. असेच हा अपघात प्रत्यक्षपणे पाहिलेल्या लोकांनी सांगितले. ओव्हरटेक करताना व्हेगर आर कारवर दिलेली धडक इतकी जोरदार होती कि दुचाकीचालक सोहरब याचा उजवा हात दर्शन काच तोडून कारच्या डेशबोर्डवर डाव्या बाजूने पडला होता. सदर दृष्य व हात पाहील्यानंतर अनेकांना सदर धडक किती प्रमाणात वेगवान होती याची प्रचिती आली.
वाहतूक सुरळीत करण्यात स्थानिकांचे पोलिसांना सहकार्य
हा अपघात घडला त्यावेळी घटनास्थळी दाखल झालेल्या डिचोली युवा काँग्रेसचे अध्यक्ष मनोज नाईक यांनी तत्काळ 108 रूग्णवाहिकेला संपर्क साधला आणि लागलीच मदत कार्याला सुरूवात झाली. यावेळी व्हेगन आर कारमध्ये चालक रामा हेडेकर (रा. मोरजी) यांच्यासह परदेशी पर्यटक जोडपे होते. त्यांना वाहनातून बाहेर काढण्यात स्थानिकांनी मदत केली. तसेच यावेळी या भागातील वाहतूक सुरळीत करण्यात स्थानिकांनी पोलिसांना सहकार्य केले.
मुळगाव ते डिचोली रस्ता धोकादायकच
सध्या अस्नोडा ते डिचोली हा रस्ता हॉटमिक्स डांबरीकरण करून सुसज्ज झाल्याने या मार्गावर सर्वच प्रकारची वाहने मोठय़ा वेगवानपणे हाकली जातात. याच रस्त्यावर मुळगाव भागात अनेक अपघात घडले असून अनेकजण जखमी झालेले आहेत. या रस्त्यावर अपघातांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली असून या रस्त्यावरील काही नाक्मयांवर गतिरोधक घालणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया युवा काँग्रेसचे अध्यक्ष मनोज नाईक यांनी व्यक्त केली आहे.
ओव्हरटेक करण्याच्या नादात एकदा बचावला होता सदर युवक.
अपघातग्रस्त युवक सोहरब हा मुळगाव येथून भरधाव वेगाने डिचोलीच्या दिशेने येत होता. अनेक वाहनांना धोकादायक ओव्हरटेक करत तो आपली दुचाकी रेटत असताना व्हाळशी डिचोली येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रांजवळील रस्त्यावर एका वाहनाला ओव्हरटेक करताना एका ट्रकच्या चाकाखाली सापडला असता. त्याचवेळी त्याला अपघात घडला असता. त्यातूनही बोध न घेता त्याने आपल्या वाहनाची गती नियंत्रणाबाहेर वाढवतच तो पुढे आला. आणि अखेर तो साष्टीवाडा बोर्डे येथे अपघातात सापडला आणि जिवाला मुकला.
ता घटनेचा पंचनामा डिचोली पोलीस निरिक्षक संजय दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली डिचोली पोलिस हवालदार विभावरी गावस यांनी केला. तर मृत्यू घटनेचा पंचनामा महिला उपनिरीक्षक मनिषा पेडणेकर यांनी केला. कारचालक रामा हेडेकर याला तसेच कारमधील परदेशी पर्यटक जोडप्यालाही अपघातामुळे किरकोळ जखमा झाल्या. त्यांना प्राथमिक उपचारानंतर सोडण्यात आले.