डिचोली / प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱया पावसाने रौद्ररूप धारण करताना केलेल्या जोरदार बरसातीमुळे डिचोली व साखळी परिसरात पुरसदृष्य स्थिती निर्माण झाली. डिचोली तालुक्मयातील सर्वच नद्या आपापल्या सीमा ओलांडून वाहू लागल्या असून पावसाचा जोर चालूच राहिल्यास अनेक भागांमध्ये पुराची स्थिती निर्माण होण्याची शक्मयता आहे. सध्या नदीकिनारी व इतर खालच्या भागात मोठय़ा प्रमाणात पाणी साचून राहिल्याने सर्वत्र पुरसदृश्य स्थिती निर्माण झालेली आहे. साखळीतील वाळवंटीतील पाण्याची पातळी बरीच वाढल्याने गेले दोन दिवस सलगपणे पंपींगद्वारे बाजारातील नाल्याती पाणी बाहेर फेकण्याची प्रक्रिया सुरूच ठेवण्यात आली आहे.
गेले अनेक दिवस जोरदारपणे सर्वत्र कोसळणाऱया पावसामुळे डिचोली तालुक्मयातील सर्वच नद्यांमध्ये पाणी काठोकाठ भरून वाहत होते. मंगळ. दि. 4 व बुध. दि. 5 ऑगस्ट रोजीही बऱयाच प्रमाणात पावसाची वृष्टी सर्वत्र झाली. मंगळवारी तर रात्रभर जोरदार वाऱयासह पावसाने दमदारच बरासत केल्याने तालुक्मयातील सर्वच नद्यांतील पाण्याने किनारा सोडला. तसेच सर्वच नाले, गटर तुडुंब भरून वाहू लागले. विविध रस्त्यांवरही पाणी साचून राहिले तसेच काही रस्त्यांना तर नद्यांचे स्वरूप प्राप्त झाले होते. या पाण्यामुळे रस्त्यांवर मात्र मोठय़ा प्रमाणात माती, दगड, धोंडे आले होते. जोरदार वाऱयामुळे डिचोली तालुक्मयातील अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाल्याचे नोंद झाले आहे. डिचोली अग्निशामक दलाचे जवान रात्रंदिवस झाडे हटविण्याच्या कामांत गुंतलेले आहेत.
साखळीत वाळवंटीला रौद्ररूप, पण पुरस्थिती नियंत्रणात
साखळीतील वाळवंटी नदीला कालच्या पावसामुळे मोठय़ा प्रमाणात पाणी आले. नदी किनारा सोडून वाहत होती. मात्र पुरस्थिती सरकारी योजनांमुळे नियंत्रणात होती. नदीची बाजार भागातील पातळी 5.7 मीटर इतकी झाली होती. जी या पावसाळी मोसमातील सर्वात जास्त आहे. तर बाजारातील नाल्याची पातळी साडेतीन मीटरच्या वर पोहोचली होती. त्यामुळे बाजारातील नाल्यात वाढलेले पाणी बाहेर काढण्यासाठी मंगळावारीपासून पंप सुरू करून पाणी बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरूच ठेवण्यात आली होती. संध्याकाळपर्यंत नदीतील पाण्याची पातळी कमी न झाल्याने बाजारातील नाल्यात भरलेले पाणी कमी होत नव्हते. साखळी भागखत पावसाचा जोर चालूच असल्याने बाजारातील नाल्यात पाणी भरणे सुरूच होते. त्यामुळे पंपींग संध्याकाळीही चलूच ठेवण्यात आले होते.
बंदिरवाडा विठ्ठलापूर साखळी या भागात नदीकिनारी असलेले देवचे पेड पाण्याखाली गेले होते. तसेच तेथे असलेल्या तोणयेश्वर मंडपाला पाण्याने वेढले होते. साखळीतील नगरपालिकेच्या मैदानावर पाणी साचले होते. तसेच तोणयेश्वर मंदिराच्या परिसरातही पाणी साचले होते. विर्डी येथे जाण्यासाठी साखळी बाजारातून असलेल्या वाटेवर पाणी भरल्याने सदर वाट ठप्प झाली होती. डिचोली जलस्रोत खात्याचे सहाय्यक अभियंता के. पी. नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली इतर अधिकारी वर्ग व कर्मचारी या पुराचा सामना करण्यासाठी तैनात होते.
मुख्यमंत्र्यांची भेट देऊन पाहणी.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळीतील पुर परिस्थितीची माहिती करून घेण्यासाठी साखळी बाजारातील पंपींग स्टेशनला भेट दिली. यावेळी अभियंता के. पी. नाईक व इतरांची उपस्थिती होती. तसेच साखळीचे नगराध्यक्ष यशवंत माडकर, नगरसेवक आनंद काणेकर, दयानंद बोर्येकर व इतरांचीही उपस्थिती होती. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांंनी सर्व यंत्रणांची पाहणी केल्यानंतर आवश्यक ती सर्व खबरदारी घेताना सतर्क राहण्याची सुचना केली.
विर्डी ते साखळी रस्त्यावर पाणी.
साखळीतील वाळवंटी व कुडणे नदीला पाणी वाढल्याने विर्डी गावातील सर्व शेतजमिनी पाण्याखाली गेल्या. विर्डी ते साखळी या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी शेतांमध्ये मोठय़ा प्रमाणात पाणी भरल्याने विर्डीतील बाबरेश्वर मंदिराजवळ रस्त्यावर पाणी आले होते. गेल्या वषीही महापुराच्या वेळी या रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात पाणी आल्याने गावातून दोन दिवस वाहतूक ठप्प झाली होती. यावषीही जोरदार पावसामुळे या रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते. या रस्त्यावरून ये जा करणाऱया वाहनांनी पाण्यातूनच वाट काढली. संध्याकाळी मात्र पावसाचा जोर कमी झाल्यानंतर रस्त्यावरील पाणी ओसरले होते.
डिचोलीतीलही नदीला मोठय़ा प्रमाणात
जोरदार पावसामुळे डिचोली नदीही दुथडी भरून वाहत होती. नदीतील पाण्याने किनारा ओलांडल्याने नदीकिनारी असलेल्या माडांच्या बागायतीत पाणी घुसले होते. तसेच डिचोली नदीला जोडलेल्या लामगाव येथून येणाऱया नाल्यातील पाणी नदीत जात नसल्याने या नाल्याचा संपूर्ण परिसर जलयम झाला होता. डिचोली बायपास रस्त्याच्या बाजूला संपूर्ण परिसर सरात पाणीच पाणी झाले होते. तसेच नदीतील पाण्याची पातळी अपेक्षेपेक्षा जास्त वाढल्याने गावकरवाडा डिचोली येथील श्री देवी शांतादुर्गा मंदिराच्या समोरील रस्ता पूर्णपणे पाणी भरले होते. तसेच त्या भागातील माडांच्या बागायतीत पाणी साचून राहिले होते. तसेच पुलांच्या खाली असलेल्या सेतू संगमवरही मोठय़ा प्रमाणात पाणी सचून होते. संध्याकाळी पावसाचा जोर कमी झाल्यानंतर सदर पाणी ओसरले होते. तसेच नदीतीलही पाण्याची पातळी घटली होती. डिचोलीतील पुरस्थिती नियंत्रणात होती. जलस्रोत खात्याचे अधिकारी डिचोलीतील परिस्थितीवर लक्ष ठेऊन होते.
अनेक ठिकाणी नदीपरिसर जलमय
सततच्या पावसामुळे डिचोली तालुक्मयातील सर्वच गावांमध्ये नदी नले दुथडी भरून वाहत आहेत. नद्या किनारा ओलांडून वाहत असल्याने गावागावातील नद्यांचे परिसर जलमय झालेले आहेत. त्यामुळे गावांमध्ये पुरसदृष्य स्थिती निर्माण झालेली आहे.अनेक ठिकाणी गटरव्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली असल्याने गटरांमधील पाणी रस्त्यावरून वाहत आहेत. तालुक्मयातील अनेक पंचायत क्षेत्रांमध्ये सध्या हिच परिस्थिती आहे.
झाडांची पडझड सुरूच. अग्निशामक दलाची धावपळ.
पावसासह येणाऱया जोरदार वाऱयामुळे सध्या डिचोली तालुक्मयात मोठय़ा प्रमाणात झाडांची पडझड नोंद झालेली आहे. डिचोली अग्निशामक दलाकडे अनेक तक्रारी आल्या असून सर्व तक्रारिं हातावेगळय़ा करणे शक्मय नसल्याने सध्या अग्निशामक दलाचे जवान तहान भूक विसरून अविश्रांत काम करीत आहे. अनेक ठिकाणी घरांवर झाडे कोसळल्याने घरांचे मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. तसेच वीज तारा आणि खांबांवर झाडे पडल्याने वीज खात्याला त्याचे नुकसान झालेले आहेच. शिवाय बऱयाच ग्रामीण भागांमध्ये सध्या वीजेचा लपंडाव सुरू आहे. काही ठिकाणी रात्रीपासून वीज गुल असल्याने लोकांचे हाल झालेले आहे. वीज खत्याचे कर्मचारीही वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी झटत आहेत. या दोनच दिवसांच्या घटनांमुळे डिचोली तालुक्मयात लाखो रूपयांचे नुकसान झालेले आहे.









