मुंबई :
2020 कॅलेंडर वर्षात डिक्सॉन टेक्नॉलॉजीसचे समभाग अगदी 253 टक्क्यांची उसळी घेऊ शकले आहेत. 2020 वर्ष कंपनीला लाभकारक ठरले आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तु निर्मात्या डिक्सॉन टेक्नॉलॉजीसच्या समभागाच्या भावात 5 टक्के वाढ दिसली. वेअरेबल गॅजेटच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱया बोट या कंपनीसोबत डिक्सॉनने एक करार केला आहे. सदरच्या कराराअंतर्गत संयुक्तपणे टव्नी वायरलेस स्पीकर्सची निर्मिती केली जाणार असल्याचे सांगण्यात येते. डिक्सॉन यासाठी आपला कारखाना उत्तर प्रदेशातील नोएडा येथे सुरू करणार आहे. इयरफोनसह इतर उपकरणांमध्ये बोट ही नावाजलेली कंपनी आहे.









