ऍड. आशिष शेलार : दोन्ही लाटेत सरकार अपयशी : लसीकरणात राजकारण नाही
प्रतिनिधी/सांगली
कोरोनाच्या दोन्ही लाटेत राज्यातील महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले आहे. सरकारने महाराष्ट्राला कोरोनाची राजधानीच बनवले आहे, असा आरोप भाजपाचे नेते आमदार ऍड. आशिष शेलार यांनी पत्रकार बैठकीत केला. ठाकरे सरकार रक्तपिपासू आहे. मराठा व ओबीसी आरक्षण आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळेच रद्द झाले. यापुढे मराठा व ओबीसी आरक्षणासाठी भाजप आक्रमक होईल, असेही ऍड. शेलार यांनी यावेळी बोलताना सांगितले.
शेलार म्हणाले, राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. देशातील कोरोना रुग्णांपैकी 20 टक्के रुग्ण केवळ महाराष्ट्रातील आहेत. शिवाय महाराष्ट्रातील मृत्यूदर 30 टक्के आहे. राज्यात पुरेशा आरोग्य सुविधा नाहीत, डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱयांची वानवा आहे, हे कोरोनाच्या पहिल्या लाटेत समोर आले होते. दुसऱया लाटेत ऑक्सिजनचा प्रश्न समोर आला. 30 जून 2021 अखेर देशात 1 लाख 21 हजार 945 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला यातील 67 हजार 296 मृत्यू महाराष्ट्रातील आहेत.
शहरातील कोरोना आज राज्यातील ग्रामीण भागात वेगाने वाढत आहे. हे ठाकरे सरकारच अपयश आहे असा आरोप करत ऍड. शेलार म्हणाले, केंद्र सरकारने राज्याला पुरेशा लसी दिल्या आहे. मात्र, राज्य सरकारने नियोजन नसल्याने लाखो लसी वाया गेल्या. लस वाटपात मंत्री जिह्या जिह्यात दुजाभाव करत आहे. दोष मात्र केंद्र सरकारला दिला जात आहे. राज्यात लसीकरण सर्वाधिक झाल्याचे श्रेय राज्य सरकार घेते. मात्र, लसीकरण केंद्र बंद पडल्यास केंद्रावर खापर पडल्या दोष देते.
सरकार रक्तपिपासू आहे. पीक विमा, कर्जमाफीचा प्रश्न आहे. पण, यावर सरकारची बोलती बंद आहे. एमपीएस्सीच्या विद्यार्थ्यांवर आत्महत्येची वेळ आल्याचा आरोप करत ऍड. शेलार म्हणाले, ठाकरे सरकारमुळेच मराठा आरक्षण न्यायालयात टिकले नाही. मराठा आरक्षणाची बाजू जोरदारपणे मांडणे आवश्यक होते. मात्र, तसे न करता राज्य सरकारने इंदिरा साहनी प्रकरण लावून धरले. राज्याचे महाधिवक्ता मुकूल रोहतगी यांनीही सर्वोच्च न्यायालयात आपाल्याला राज्य सरकारन कडून सहकार्य व कागदपत्रे मिळत नसल्याचे सांगितले आहे.
यावरून या सरकारला मराठÎांना आरक्षण द्यायचेच नाही. ओबीसी आरक्षणाचा खेळखंडोबा याच सरकारने केला असल्याचे सांगत शेलार म्हणाले, यापुढे मराठा व ओबीसी आरक्षणासाठी भाजप आक्रमक होणार आहे. आघाडी सरकार अंतर्गत वादाने पडेल. मुंबई महापालिका निवडणुकीत आम्ही मनसेची साथ घेणार सनल्याचे शेलार यांनी सांगीतले. राज्याच्या भल्यासाठी सर्वच पक्षांनी एकमेकांशी संवाद साधला पाहिजे. मात्र, काँग्रेस, राष्ट्रवादीत हा संवाद होताना दिसत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
हवा बदलली की पटोलेंचे वक्तव्य बदलते
ऍड. शेलार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरही टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, पटोले हे हवा बदलेल तशी वक्तव्ये बदलतात. आधी त्यांचे फोन टॅपिंग भाजपाने केल्याचा आरोप केला, नंतर म्हणाले, त्यांच्याच आघाडीतील मुख्यमंत्री, उपमुख्यंत्र्यांनी माझे फोन टॅप केले. यावर घुमजाव घेत पुन्हा भाजपवर आरोप केले. फोन टॅपिंग प्रकरणी सरकारने कोणतीही चौकशी करावी. याप्रकरणी ते अडीच तीन वर्ष गप्प का होते.








