ऑनलाइन टीम / नाशिक :
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं आडनाव ठाकरे नसतं, तर ते आज संगीतकारांमध्ये दिसले असते, अशी टीका शिवसेनेचे आमदार आणि नवनिर्वाचित पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे. नाशिकमध्ये पोटनिवडणुकीच्या प्रचारात ते बोलत होते.
ते म्हणाले, एक पानवाला आज राज्याचा कॅबिनेट मंत्री आहे. ही किमया बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्येच होते. मनसे आता आहे तरी कुठे? ज्यांनी बाळासाहेबांना धोका दिला, त्यांचा सत्यानाश झाला आहे.
मनसेच्या नेत्याचे नाव जर ठाकरे नसते, तर कुठेतरी संगीतकारांमध्ये दिसले असते. त्यामुळे ठाकरे आडनावाचे वलय त्यांच्याकडे दिसत आहे, असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.









