ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
ट्विटरने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ‘टीम ट्रम्प’ नावाचे अकाऊंट अस्थायी स्वरूपात ब्लॉक केले आहे.
ट्रम्प कार्यालयाकडून ‘टीम ट्रम्प’ नावाच्या ट्विटर अकाऊंटचा निवडणूक प्रचारासाठी वापर करण्यात येत होता. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवार जो बायडेन यांच्या मुलाची वैयक्तिक माहिती ट्रम्प यांच्या अकाऊंटवरून ट्विट करण्यात आली होती. त्यानंतर ट्विटरने ट्रम्प यांच्या प्रचाराचे अकाऊंट ब्लॉक केले.
बायडेन यांचा मुलगा हंटर बायडेनच्या युक्रेनमधील व्यवसायाबद्दल माहितीबद्दल देणारा व्हिडीओ या अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला होता. व्हिडीओसोबत ‘जो बायडेन खोटे आहेत आणि ते कित्येक वर्षापासून देशाला धोका देत आहेत’ असे कॅप्शन दिलेले होते. एखाद्याची वैयक्तिक माहिती शेअर करणे ट्विटरच्या नियमांविरोधात आहे. त्यामुळे ट्रम्प यांना अकाऊंट सुरू ठेवायचे असेल तर हंटर बायडेनचा व्हीडिओ डिलीट करावा लागेल, असे ट्विटरने म्हटले आहे.









