प्रतिनिधी / इस्लामपूर
धोत्रेवाडी-कासेगाव रस्त्यावर वीट वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात प्रसाद पोपट ताटे ( वय २० रा.धोत्रेवाडी, ता. वाळवा) हा युवक ठार झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला. हा अपघात बुधवारी दुपारी झाला.
विक्रम सुरेश यादव (वय २२ रा. धोत्रेवाडी) असे जखमीचे नाव आहे. ट्रॅक्टरचालक नामदेव प्रल्हाद शिंगे (२५, रा. नरसिंहपूर ) याने कासेगाव पोलिस ठाण्यात अपघाताची फिर्याद दिली आहे. धोत्रेवाडी येथील विक्रम यादव व प्रसाद ताटे हे दोघेजण कासेगावहून मोटारसायकल (एम. एच.१० बी. के. ११७४) वरून धोत्रेवाडी कडे निघाले होते. दरम्यान धोत्रेवाडी येथील मानेगल्ली परिसराच्या वळणावर शिंगे हे विटा भरून ट्रॅक्टर क्रमांक ( एम.एच.२४ डी.१९०१) घेऊन कासेगावकडे चालले होते. यावेळी मोटरसायकलची समोरा-समोर धडक झाली. यामध्ये पाठीमागे बसलेल्या प्रसाद याच्यासह मोटारसायकल घसरून फरफटत ट्रॉलीला जाऊन धडकली. यावेळी मोटरसायकल चालक विक्रम यादव हा जखमी झाला तर पाठीमागे बसलेला ताटे याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला उपचारासाठी इस्लामपूर येथे नेत असताना त्याचा मृत्यू झाला. प्रसादच्या अपघाती मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सहाय्यक पोलीस फौजदार जयकुमार उथळे अधिक तपास करीत आहेत.
Trending
- Testing1
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








