ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात दुसऱ्यांदा महाभियोग चालवण्यात येत आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून त्याच्या सुनावणीला सुरूवात झाली आहे.
अमेरिकेत नव्याने निवडून आलेले राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या विजयावर सिनेटमध्ये शिक्कामोर्तब होत असताना ट्रम्प समर्थकांनी कॅपिटॉल हाऊसमध्ये घुसून हिंसाचार माजवला होता. 6 जानेवारीला घडलेल्या या हिंसाचाराला ट्रम्प यांनीच चिथावणी दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. ट्रम्प यांच्या विरोधात रिपब्लिकन पक्षातील 6 जणांनी स्पष्ट मत दिले होते. 2020 मध्ये राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत युक्रेनची मदत मागितल्याचा आरोपावरून पहिल्या महाभियोगाला सामोरे जावे लागले होते.
सध्याच्या सिनेटमध्ये डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन्स या दोन पक्षांचे बलाबल 50-50 असे आहे. त्यामुळे महाभियोग मंजुरीसाठी डेमोक्रॅटिक पार्टीला सिनेटमध्ये दोन तृतीयांश मतांची गरज आहे.









