पेडणे ( प्रतिनिधी )
मालपे पेडणे येथे राष्ट्रीय महामार्गवर शनिवारी रोजी दुपारी 1 वाजता मालपे हायवे येथे खडी भरून सावंतवाडी येथुन पणजीच्या दिशेने जात असलेला ट्रकचा टायर फुटून दुजाभक ओलांडून उजव्या बाजूने दरीत गेला.तर मागील ट्रकचे हायजिंक दुभाजकाला लागून मागील चाके व हायजिंग वेगळे झाले.
शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सावांवाडी येथून खडी घेऊन येणाऱया ट्रक क्रमांक एम . एच07 एक्स 0339 हा ट्रक मालपे येथे उतरणीवर अचानक गाडीचा पाठीमागचा टायर फुटल्याने गाडिची मागील चाके दुभाजृकाला लागून वेगळी झाली.तर पुढील भाग हा सुमारे उजव्या बाजूच्या सुमारे वीस मीटर अंतरावर खोल दरीत दोन भाग कोसळळी. गाडीत चालक बबन भालेकर आणि क्लिनर दीनेश केसरकर गाडीच्या पुढच्या केबिनमध्ये मध्ये अडकले होते . पेडणे अग्नी शामक दलाला कळताच अग्नी शामक दलाचे अधिकारी व जवान ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली.व त्यात अडकलेल्या दोघाना बाहेर काढले.
अग्निशमन दलाचे अधिकारी प्रशांत धारगळकर, रामदास परब , शेखर मयेकर, प्रदिप आसोलकर, अविनाश मयेकर, प्रज्योत होबळे, प्रशांत सावळ देसाई, मनोज साळगावकर, आमोल परब , विकास चव्हाण आदी जवानानी जखमीना बाहेर काढले.
जखमी चालक व क्लिनर यांना 108 रुग्णवाहिकेने आझिलो येथील जिल्हा इस्पितळात उपचारासाठी नेण्यात आले. पेडणे पोलीस स्थानकाचे हवालदार राजेश येशी यांनी अपघाताचा पंचनामा केला.









