वार्ताहर / टोप
टोप येथील प्राथमिक शाळेच्या पश्चिमेस असलेल्या इनामातील तिन एकर क्षेत्रातील उस शॉर्टसर्किटने आग लागुन खाक झाला. मोठ्या प्रमाणात शेतकर्यांचे नुकसान झाले आहे.
टोप प्राथमिक शाळेच्या पश्चिमेस असलेले इनाम शेतात रामचंद्र पाटील, सचिन पाटील, शिवाजी पाटिल, हरी पाटील, स्वाती पाटील, सचिन दयानंद पाटील, एकनाथ पाटील, नामदेव पाटील या सगळ्याच्या मालकी असलेले ३ एकर क्षेत्रातील उस जळाला आहे. याबाबत छत्रपती राजाराम साखर कारखान्याचे माजी संचालक संभाजी महाडिक यांनी भेट देवुन तात्काळ राजाराम कारखान्याच्या प्रशासनास तात्काळ यंत्रणा राबवुन जळीत उस तोडण्यास सांगितले.यावेळी कारखान्याचे शेती मदतनीस सुंगध वाघ, धनवडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.









