विविध मंडळासह घरगुती भाविकांकडून देवीला पंचगंगेचे नवे पाणी अर्पण
अनेकांकडून खारा, गोडा व शिधा स्वरुपात नैवेद्य
त्र्यंबोली यात्रेनिमित्त शुक्रवारी टेंबलाई देवीची चतुर्भूज रुपात अलंकारिक महापूजा बांधली होती
प्रतिनिधी / कोल्हापूर
पावसाच्या सरी झेलत टेंबलाई टेकडी येथील 109 टी. ए. मराठा लाईट इफ्रंट्री बटालियन, शिवाजी पेठेतील शिवाजी तालमीसह व विविध मंडळे व घरगुती भाविकांनी शुक्रवारी त्र्यंबोली यात्रा साजरी केली. मराठा बटालियनचे सुभेदार मेजर यांच्या हस्ते टेंबलाई टेकडीवरील टेंबलाईदेवीला साडी-चोळी, खारा वाटा व पंचगंगा नदीचे नवे पाणी अर्पण करण्यात आले. याचबरोबरच विविध मंडळांसह अनेक घरगुती भाविकांनीही मंदिराकडे जाऊन देवीला खाऱया व गोडÎा वाटÎासह आंबिल, डाळ, गुळ, तांदुळ, गहु आणि बटाटे असा शिधा नैवेद्य म्हणून अर्पण केला. मंदिरासमोरील दिपमाळेजवळच्या पायरीवर नदीचे पाणी, वाटा व नैवेद्य अर्पण करण्याची केली होती.
दरम्यान, त्र्यंबोलीयात्रेनिमित्त सकाळी साडे आठ वाजता टेंबलाई मंदिराचे वहिवाटदार पुजारी प्रदीप गुरव व मधुकर गुरव टेंबलाईदेवीची षोडशोपचार पूजा केली. यानंतर त्यांनीच देवीची चतुर्भूज रुपात अलंकारिक महापूजा बांधली. मंदिरात यज्ञही घालण्यात आला. यावेळी सारा जगातून कोरोना नाहीसा होऊ दे, भारतीय सैन्य दलासह समस्त भारतवासिय कोरोनापासून सुरक्षित राहू दे, असे टेंबलाईदेवीला यज्ञाच्या साक्षीने साकडे घालण्यात आले. सकाळी साडे दहानंतर विविध तालीम संस्था, मंडळांचे कार्यकर्ते व घरगुती भाविकांची पाऊले टेंबलाई मंदिराकडे वळली. त्यांनी टेंबलाईदेवीला साडी-चोळीबरोबरच खारा व गोडा वाटÎासह आंबिल आणि शिधा स्वरुपातील नैवेद्य अर्पण करुन टेंबलाई-मरगाईच्या नावानं चांगभलं असा अखंड गजर केला. दुपारच्या सुमारास तर एका भाविकाने टेंबलाईदेवीला चक्क रेडा अर्पण केला.
जवानांनी केले श्रमदान
त्र्यंबोलीयात्रा कालावधीत टेंबलाई मंदिर परिसरात स्वच्छता मोहिम राबवण्याचे शहरातील विविध मंडळे, तालीम संस्थांना वहिवाटदार पुजारी मंडळाने आवाहन केले आहे. या आवाहनानुसार शुक्रवारी 109 टी. ए. मराठा लाईट इफ्रंट्री बटालियनच्या जवानांनी दोन तास श्रमदान करत मंदिराचा परिसरात स्वच्छता केली. तसेच जमलेल्या कचऱयाची योग्य ठिकाणी विल्हवाटही लावली.









