बेळगाव
ऑटोमेटीक टॅक न बदलल्याने बुधवारी सायंकाळी रेल्वे अर्धा तास बेळगाव रेल्वेस्थानकामध्ये खोळंबून राहिली. मॅन्युअली ट्रक बदलून रेल्वे पुढे मार्गस्थ करण्यात आली. परंतु या प्रकारामुळे रेल्वेस्थानक परिसरात गोंधळ निर्माण झाला होता. तसेच पुढील प्रवास करणाऱयांना अर्धा तास ताटकळत रेल्वेस्थानकावर थांबावे लागले.
पुद्दुचेरी-दादर (मुंबई) रेल्वे वेळेप्रमाणे सायंकाळी 6 च्या सुमारास बेळगाव रेल्वेस्थानकात दाखल झाली. परंतु ट्रक बदलला गेला नसल्याने रेल्वे थांबविण्यात आली. रेल्वे का थांबली? अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली. रेल्वे कर्मचाऱयांच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी मॅन्युअली ट्रक बदलला. यामध्ये अर्धा तास वाया गेला. 6.30 नंतर रेल्वे मिरजकडे रवाना करण्यात आली. रेल्वेची गती कमी असल्याने मोठा अनर्थ टळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.









