नवी दिल्ली
देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कंसल्टन्सी सर्व्हिसेजला (टीसीएस) मागे टाकत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड बाजारी भांडवलाच्या हिशोबात देशामधील बाजारमूल्यात सर्वोच्च स्थान पटकावले आहे. मंगळवारी बीएसई बंद झाल्यानंतर आरआयएलचे बाजारमूल्य 7,05,211.81 कोटी रुपयावर राहिले आहे. तर टीसीएसचे बाजारमूल्य 6,84,078.49 कोटी रुपयावर राहिले आहे. यामुळे रिलायन्सचे बाजारमूल्य टीसीएसपेक्षा 21,133.32 कोटी रुपयांनी अधिक झाले आहे.
आरआयएलचे समभाग मंगळवारी 7.76 टक्क्मयांच्या तेजीसोबत 1,112.45 रुपयावर राहिला आहे. दुसरीकडे टीसीएसचे समभाग 2.64 टक्मक्मयांनी वधारुन 1,823.05 रुपयावर राहिला आहे. गेल्या 27 मार्चला आरआयएलला मागे टाकत टीसीएस बाजारी भांडवलाच्या हिशोबात देशातील सर्वाधिक मूल्य असणारी कंपनी बनली होती. या कामगिरीसोबत दोन्ही कंपन्या आरआयएल आणि टीसीएस या अगोदर बाजारातील भांडवलाच्या आधारावर एक दुसऱयाला टक्कर देत प्रवास सुरु असल्याचे पहावयास मिळाले आहे. यात ऊर्जा, वित्तीय आणि दररोज वापरांत येणाऱया साहित्यांची निर्मिती करणाऱया एफएमसीजी कंपन्यांचे समभागांमध्ये तेजीची नोंद करण्यात आली होती.








