मुंबई
ऑटो क्षेत्रातील कंपनी टीव्हीएस कंपनीच्या समभागाच्या भावांनी दोन वर्षानंतर उच्चांकी स्तर गाठल्याचे दिसून आले आहे. मंगळवारी शेअर बाजारात कंपनीचे समभाग 11 टक्के वाढत 793 रुपयांवर पोहचले होते. सदरची वाढ ही इलेक्ट्रिक वाहनांकरीता आगामी काळात निधी उभारण्याच्या प्रयत्नाच्या बातमीनंतर दिसली आहे. यापूर्वी कंपनीच्या समभागाचे भाव 2 जानेवारी 2018 मध्ये 795 रुपयांपर्यंत पोहचले होते. कंपनी इलेक्ट्रिक वाहनांवर आपलं लक्ष केंद्रीत करणार असून यासाठी 1 हजार कोटी रुपये गुंतवणार असल्याचे समजते.









