नवी दिल्ली
चेन्नईस्थित टीव्हीएस मोटर कंपनीची आय क्युब इलेक्ट्रिक स्कुटर नुकतीच नवी दिल्लीत दाखल करण्यात आली आहे. या गाडीची किंमत 1.08 लाख रुपये असणार असून एकदा चार्ज केल्यानंतर 75 किमी इतके अंतर ही गाडी कापू शकणार आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह इतर निवडक वितरकांकडे सदरची गाडी उपलब्ध करण्यात आली आहे. टीव्हीएस आय क्युब इलेक्ट्रीक गाडी कंपनीच्या संकेतस्थळावरही खरेदी करता येणार आहे. त्याकरीता 5000 रुपये आगाऊ भरावे लागणार आहेत. मागच्या वर्षी बेंगळुरात जानेवारीत सदरच्या गाडीचे लाँचिंग केले गेले होते. तेव्हा ग्राहकांचा या गाडीला उत्तम प्रतिसाद लाभला होता.









