ऑनलाईन टीम / मुंबई :
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री सेजल शर्मा हिने राहत्या घरी गाळफास घेऊन आत्महत्या केली. स्टार प्लस वाहिनीवरील ‘दिल तो हैपी है जी’ या मालिकेतील भूमिकेमुळे ती प्रकाशझोतात आली होती.
अभिनय क्षेत्रात काम मिळत नसल्याने आलेल्या नैराश्यातून तीने आत्महत्या केल्याचे सुसाईड नोटमधून समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सेजल ही मूळची राजस्थानमधील उदयपूर येथील आहे. कामानिमित्त ती मिरा रोडमधील शिवार गार्डन भागात रॉयल नेस्ट इमारतीत आपल्या मैत्रिणीसह राहत होती. तिने स्टार प्लस वाहिनीवरील ‘दिल तो हैपी है जी’ या मालिकेत काम केले. मात्र, मागील दीड महिन्यांपासून तिला काम मिळत नव्हते, त्यामुळे ती नैराश्यात होती. त्याच नैराश्यातून तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या अचानक जाण्याने चित्रपट सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त होत आहे.
शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून, अंत्यसंस्कारासाठी तिचे पार्थिव उदयपूर येथील मूळ गावी नेण्यात आले आहे.









