ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
न्यूझीलंड दौऱयातील टी-20 मालिका विजयाच्या आनंदात असलेल्या टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. हिटमॅन, सलामीवीर रोहित शर्माने एकदिवसीय आणि कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे.
न्यूझीलंड विरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या टी-20 सामन्यात रोहितला स्नायू दुखावल्यामुळे अर्ध्यातूनच मैदान सोडावे लागले होते. त्याची ही दुखापत गंभीर असल्यामुळे तो तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघासोबत नसेल. त्याच्या अनुपस्थितीत संघात कोणाला संधी मिळणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, न्यूझीलंड दौऱ्याआधी जलद गोलंदाज इशांत शर्मा आणि सलामीवीर शिखर धवन हे दोन खेळाडू दुखापतग्रस्त झाले होते.









