उतरण मालिकेतल्या इच्छा या व्यक्तिरेखेमुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे टीना दत्ता. टीना सोशल मीडियावर सक्रीय असते. तिने फिटनेस जपला आहे. टीना वेगवेगळे व्यायामप्रकार करतानाचे फोटोही पोस्ट करत असते. आज आपण टीनाच्या फिटनेसचं रहस्य जाणून घेऊ.
- टीनाने तुलासन करतानाचा एक फोटो पोस्ट केला होता. योगामुळे माणसाचा दृष्टीकोनच नाही तर माणूसही बदलतो, असं तिने नमूद केलं होतं. या आसनामुळे मनगट, दंड आणि पोटाच्या स्नायूंना बळकटी मिळते. यामुळे पोटाशी संबंधित समस्या दूर होतात आणि चेहरा उजळतो.
- शीर्षासन हे देखील उपयुक्त योगासन आहे. टीना हे कठीण योगासनही करते. शीर्षासन हे टीनाच्या फिटनेसचं प्रमुख अत्र असून हे आसन करतानाचे फोटो ती पोस्ट करत असते.
- टीनाने ऍक्रो योगा करतानाचा फोटोही पोस्ट केला आहे.
- फिटनेस दीर्घकाळ टिकवून ठेवायचा असेल तर तुम्ही बकासन करायला हवं. टीना दत्ताही हाच संदेश देते. बकासन करतानाचा तिचा फोटो खूप काही सांगून जातो.बकासनामुळे शरीरात आतून आणि बाहेरून बळकट होतं. पाठीचा कणा लवचिक होतो. तसंच सौंदर्यवृद्धीही होते.
- टीना गरूडासनही करते. या आसनामुळे हात तसंच पायांचे स्नायू बळकट होतात, असं ती सांगते.









