वृत्तसंस्था/ ख्राईस्टचर्चदुसऱया कसोटीवर भारताचे वर्चस्व
ऑस्ट्रेलियाविरूद्ध होणाऱया आगामी टी-20 मालिकेसाठी क्रिकेट न्यूझीलंडने रविवारी न्यूझीलंड संघाची घेषणा केली. या संघामध्ये दुखापतग्रस्त मार्टिन ग्युप्टीलचा समावेश करून न्यूझीलंडच्या निवड समितीने त्याच्यावर विश्वास दाखविला आहे.
उभय संघातील या मालिकेतील पहिला सामना ख्राईस्टचर्चमध्ये 22 फेब्रुवारीला होणार आहे. न्यूझीलंड संघामध्ये या मालिकेसाठी ग्युप्टीलला आणखी एक संधी देण्याचा निर्णय क्रिकेट न्यूझीलंडने घेतला आहे. विंडीज आणि पाकविरूद्ध गेल्या डिसेंबरमध्ये झालेल्या पाच सामन्यांमध्ये ग्युप्टीलची कामगिरी समाधानकारक झाली नव्हती.
न्यूझीलंड संघ- केन विल्यम्सन (कर्णधार), बेनेट, बोल्ट, चॅपमन, कॉन्वे, ग्युप्टील, जेमीसन, नीशम, फिलीप्स, सँटनर, सिफर्ट, सोधी आणि टीम साऊदी.









