प्रतिनिधी/ बेळगाव
नेहरू रोड, टिळकवाडी येथील एका रहिवाशाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आहे. मानसिक ताणतणावातून त्याने आपले जीवन संपविले आहे. टिळकवाडी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
संजय मधुकर कुलकर्णी (वय 55, रा. नेहरू रोड, टिळकवाडी) असे त्याचे नाव असून बॉक्साईट रोडवरील एका खासगी कंपनीत तो कामाला जात होता. मानसिक ताणतणावातून शनिवार दि. 17 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 12.30 या वेळेत नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.
घटनेची माहिती समजताच टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संजय हे अलीकडे मानसिक ताणतणावात होते. या तणावातूनच त्यांनी आपले जीवन संपविले आहे.









