ऑनलाईन टीम सातारा :
कोरोना टेस्टिंगचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी कण्हेर आणि लिंब प्राथमिक आरोग्य केंद्रातील टीमने साताऱ्यानजीकच्या डिमार्टमध्ये मागील महिनाभरापासून ठाण मांडले आहे. डिमार्टमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाची अँटीजन टेस्ट करूनच त्याला डिमार्टमध्ये प्रवेश दिला जात आहे. कण्हेर आणि लिंब PHC दररोज डिमार्टमध्ये येणाऱ्या प्रत्येकी 150 ते 200 लोकांच्या अँटीजन टेस्ट करते.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि पॉझिटिव्हीटी रेट कमी आणण्यासाठी जास्तीतजास्त लोकांच्या कोरोना टेस्ट करण्यात येत असल्याचे तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येते.









